टीव्ही नाही आता SONY लाँच करणार इलेक्ट्रानिक कार, ऑटो इंडस्ट्रीमध्ये एंट्री


यावर्षीच्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (Consumer Electroni Show 2020) मध्ये सोनीने एक इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार (Electric Concept Car) लाँच केली. या कारचे नाव व्हिजन- एस (Vision-S) असं ठेवण्यात आलं आहे. ऑटो क्षेत्रात सोनीचे हे पहिले पाऊल आहे.लॅपटॉप, टॅब आणि मोबाइल फोनसह तमाम इलेक्ट्रनिक उत्पादनं तयार करण्यात जपानची सोनी कंपनी अग्रेसर आहे. सोनी कंपनी नेहमी नवं नवीन इलेक्ट्रॉनिक उत्पादन तयार करत असते. परंतु, आता ऑटो इंडस्ट्रीमध्ये उतरणार आहे.

आता सोनीची कार म्हटल्यावर त्यात खास फिचर्स असणार हे स्पष्ट आहे. या कारमध्ये 33 वेगवेगळे सेंसर्स देण्यात आले आहे. यामध्ये इमेज सेंसर (Image Sensors) आणि टाइम ऑफ फ्लाइट सेंसर्स (ToF Sensors) दिले आहे. यामुळे कारमध्ये आत आणि बाहेर उभ्या असलेल्या लोकांची ओळख पटवू शकते. याचा वापर हा फोन कॅमेऱ्याद्वारेही केला जावू शकतो. या दोन्ही सेंसर्समुळे लोकं आणि वस्तूंची ओळख पटवण्यास सोपं होईल.
Vision S कार आतमधून अत्यंत सुबकपणे तयार करण्यात आली आहे. डॅशबोर्डवर एक स्क्रीन देण्यात आली आहे. हा डॅशबोर्ड चिनी इलेक्ट्रिक कार स्टार्टअप Byton सारखी दिसते. सोबतच मागे बसणाऱ्या लोकांसाठी समोरील सीटच्या मागे एक स्क्रिन दिली आहे. यामध्ये ऑनबोर्ड इंटरटेनमेंट सिस्टम फिचर दिले आहे. सोनीने याला "Safety Cocoon Concept" असं नाव दिलं आहे. हे फिचर  कार 360 डिग्रीवर येणाऱ्या सर्व वस्तूंची ओळख पटवून देईल.
सोनीने लास वेगासमध्ये होणाऱ्या या इव्हेंटमध्ये कारवरून पडदा बाजूला केला आहे. ही एक कॉन्सेप्ट कार असून तांत्रिक दृष्ट्या एक मोठा प्रयोग आहे.  या कारमध्ये सोनीचं  ऑडिओ सिस्टम असणार आहे,  ज्याला कंपनीन्  '360 रियॅलिटी ऑडिओ' (360 Reality Audio) नाव दिलं आहे. कारच्या प्रत्येक सीटमध्ये ही सिस्टम देण्यात आली आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment