![]() |
कॅब ड्रायव्हरमुळे सोनम कपूर सोबत झाला हा प्रकार |
सध्या सोनम कपूरची वेळ फारशी चांगली नाही असंच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी विमानतळावर तिचं सामान हरवलं गेलं. तर आता लंडनमध्ये तिच्यासोबत असं काही झालं की ती पुरती घाबरून गेली आहे.
सोनम कपूरसोबत नक्की काय झालं...
सोनमने ट्वीट करत म्हटलं की, लंडनमध्ये उबरसोबतचा मला अनुभव फार भयावह होता. तुम्ही काळजी घ्या. इथली लोकल सर्विस किंवा सार्वजनिक वाहनांचा तुम्ही वापर केल्यास ते जास्त सुरक्षित असेल. मी पूर्णपणे हादरून गेले आहे.
सोनमच्या या ट्वीटनंतर मित्र- परिवार आणि चाहत्यांनी तिला कमेन्ट करून नक्की काय झालं असे प्रश्न विचारले जाऊ लागले. एका युझरने लिहिले की, 'काय झालं सोनम? मी लंडनमध्ये नियमित उबर कॅबने प्रवास करतो त्यामुळे काय झालं हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.'
यावर उत्तर देताना सोनमने लिहिले की, 'माझा ड्रायव्हर मानसिकरित्या अस्वस्थ होता. तो सतत माझ्यावर जोरजोरात ओरडत होता. मी शेवटपर्यंत घाबरून त्या गाडीत बसले होते.'
0 comments:
Post a Comment
Please add comment