शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढली

शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढली

दिल्लीतील 'सहा जनपथ' येथे शरद पवारांचं निवासस्थान आहे. तिथं दिल्ली पोलीस व सीआरपीएफचे प्रत्येकी तीन जवान तैनात होते. २० जानेवारीपासून त्यांना हटवण्यात आलं आहे. पवारांसह आणखी ४० व्यक्तींची सुरक्षा हटवण्यात आल्याची माहितीही पुढं आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारनं तडकाफडकी हटविली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलाची पार्श्वभूमी सरकारच्या या निर्णयाला असल्याचीही चर्चा आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षा पुरवली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जातो. वेळोवेळी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. सुरक्षेत कपात करायची असल्यास संबंधित व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना दिली जाते. मात्र, शरद पवारांच्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही. पवारांची सुरक्षा काढण्याचं कुठलंही कारण सरकारनं दिलेलं नाही, असं दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.

अलीकडंच केंद्र सरकारने गांधी कुटुंबातील सदस्यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा हटवली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यानंतर पवारांची सुरक्षा हटवण्यात आली आहे.\
राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय आकसातून सरकारनं हे पाऊल उचलल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 'केंद्रातलं सरकार लोकशाही मानतच नाही. सुरक्षा व्यवस्था काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का, असा सवाल त्यांनी केला. 'भाजप सरकारच्या अशा निर्णयामुळं महाराष्ट्राच्या मनात त्यांच्याबद्दलचा रोष आणखी वाढेल, असं आव्हाड म्हणाले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment