सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडलाअमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणि देशांतर्गत अस्थिरतेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजार उघडताच जोरदार विक्री केली. यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडला. सध्या तो ४१ हजारांवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत तब्बल १४० अंकांची पडझड झाली असून तो १२ हजार ८७ अंकांवर आहे.
आजच्या सत्रात स्थावर मालमत्ता, बँका, एनबीएफसी, आयटी, टेक या क्षेत्रांत गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे.आजच्या सत्रात टेक महिंद्रा, आयटीसी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स, एचडीएफसी बँक, मारुती, एसबीआय, एशियन पेंट पॉवरग्रीड, एचडीएफसी हे शेअर घसरले. आशियातील सिंगापूर आणि जपानमधील बाजारात नकारात्मक सुरुवात झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खनिज तेल आणि सोने या दोन प्रमुख वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने दर १.२ टक्क्यांनी वाढून १५६९ डॉलर प्रति औस गेला आहे. खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल ६९.६२ डॉलर आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment