![]() |
सेन्सेक्स ४२००० हजार अंकांवर |
अर्थसंकल्पाचे वेध लागलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी नवा सार्वकालीन उच्चांक गाठला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १७७ अंकांनी वधारून ४२०५० अंकापर्यंत वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४२ अंकांच्या वाढीसह १२३८६ अंकांवर आहे.
गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय खुला
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संघर्ष मिटल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी आहे. आजच्या सत्रात सन फार्मा, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, टायटन, ऍक्सिस बँक, एसबीआय, मारुती, टीसीएस हे शेअर तेजीत आहेत. एशियन पेंट, ओएनजीसी, आयटीसी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी हे शेअर घसरले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सामान्य करदात्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर स्तर बदलणे किंवा वैयक्तिक करात कपात केली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्याशिवाय विमा आणि इतर उद्योगांना सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा आगामी अर्थसंकल्पात केली जाण्याची शक्यता आहे. चीनसोबत सुरु असलेल्या व्यापारी युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे.
दोन्ही देशांमधील चर्चेचा पहिला टप्पा व्हाईट हाऊसमध्ये पार पडला. दरम्यान, मागील काही सत्रात खनिज तेलाच्या किमतीत घसरण झाली. या सर्व घडामोडी शेअर बाजारातील तेजी वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे दलालांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment
Please add comment