![]() |
देशी वाणाच्या (seed) बँकर राहीबाई पोपेरे पद्म पुरस्कारराने सन्मानित |
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देशभरातील ११८ नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे, अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खानसह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
राहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. निरक्षर असूनही राहीबाईंनी अहमदनगरमधील आदिवासी भागात कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जैविक बियाणांची बँक चालवत असल्यामुळे त्या 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन केलं आहे. तर जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील मानकरी
महाराष्ट्रातील एकूण ११ नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून त्यात क्रिकेटपटू झहीर खान, डॉ. पद्मावती बंदोपाध्याय, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, एकता कपूर, कंगना रनौत, अदनान सामी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यद मेहबूब शाह कादरी ऊर्फ सय्यदभाई, डॉ. सुरेंद्र डेसा सौजा आणि सुरेश वाडकर आदींचा समावेश आहे.
कोण आहेत राहीबाई
राहीबाई पोपेरे या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळने या आदिवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला शेतकरी आहेत. राहीबाई मूळच्या याच गावच्या. राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला.बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.
देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला.
देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला.
0 comments:
Post a Comment
Please add comment