समुद्री शेवाळी अर्क म्हणजे काय?
समुद्रात वाढणा-या काही उपयुक्त वनस्पतींचा अर्क काढुन तो पिकांच्या वाढीसाठी वापरणे होय.
समुद्री शेवाळी अर्कातील आवश्यक घटक:
समुद्री शेवाळी अर्कात अनेक पिकांच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. त्याच बरोबर अनेक आवश्यक आम्ले, जीवनसत्वे, संजिवके म्हणजेच ऑक्सिन्स, जिबरेलिन्स, अँन्टीबायोटीक्स हे सर्व पिकांना आवश्यक असणारे घटक समाविष्ट आहेत.
समुद्री शेवाळी अर्क : भुसुधारक
समुद्री शेवाळी अर्कामधील आवश्यक आम्ले भुसुधारकाचे कार्य करतात. ह्या आम्लामधील अल्जीनिक ॲसिड पाण्याची जलधारण क्षमता वाढविण्याचे कार्य करते.
याच आम्लांमुळे अतिवृष्टी भागातही मातीतुन आवश्यक अन्नद्रव्ये वाहुन जाण्यास आळा बसतो व माती सुपिक रहाते.
प्रयोगानुसार असे सिद्ध झाले आहे कि समुद्र शेवाळी अर्कामुळे ११% पेक्षा जास्त मातीची जलधारण क्षमता सुधारते.
याच आम्लामुळे मातीची प्रत सुधारते व हवा खेळती रहाण्यास मदत होते.
त्याच बरोबर समुद्री शेवाळी अर्कामुळे मातीतील सुक्ष्मजीवांच्या संख्येत प्रकार्षाने वाढ होते.याच सुक्ष्मजीवांचा उपयोग हवेतील आवश्यक अन्नद्रव्ये मातीत स्थिर करण्यास होतो.
समुद्री शेवाळी अर्क सुक्ष्म जीवाणुंचे व जैविक घटकांचे अतिशय लहान भागात रुपांतर करते व या जैविक घटकांचे विघटन जलद गतिने होण्यास उपयुक्त ठरते.
या बरोबरच अल्कलीयुक्त मातीचा सामु स्थिर करण्यासाठी देखिल हे उपयोगी आहे.
समुद्री शेवाळी अर्क : आवश्यक पिक संजिवक
समुद्री शेवाळी अर्क बियाण्यावर वापरल्यास बियाणांची उगवण क्षमता हि जलद होते.
पिकांची अन्नद्रव्ये शोषून घेण्याच्या क्षमताही वाढवण्याचे कार्य समुद्री शेवाळी अर्क करते.
आवश्यक अन्नद्रव्यांबरोबरच समुद्
0 comments:
Post a Comment
Please add comment