नोकरीच्या शोधार्थ असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने स्पेशल ऑफिसरसह इतर पदांसाठी भरती सुरू केली आहे. तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल किंवा तुम्हाला यासंबंधिची माहिती हवी असल्यास sbi.co.in या वेबसाईटवर भेट द्या. इच्छुक उमेदवारासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी असणार आहे. तुम्हाला नोकरीची गरज असेल तर तुम्ही आजच ऑनलाईन पद्धतीनं नोकरीसाठी अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज 24 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आहेत. त्यानंतर मात्र अर्ज भरण्याची मुदत पुन्हा देण्यात येणार नाही असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
अर्ज करण्याची काय आहे प्रक्रिया
सगळ्यात पहिल्यांदा SBI sbi.co.in या बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर लिंक टू अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा. त्यानंतर तुमची माहिती, तुमचा रिझ्युम, फोटो आणि सही अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. ते ऑनलाईन स्वरुपात डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगनेच भरता येते. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक PDF येईल ते तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट असेल.
कोणत्या पदांसाठी आहे भरती.
1.Defence Banking Advisor (संरक्षण बँकिंग सल्लागार)
2.(Navy & Air Force) Contractual 2 (नौदल आणि वायुदल ) संविदात्मक 2)
3.Circle Defence Banking Advisor Contractual 2 (सर्कल डिफेंस बैंकिंग सलाहकार संविदा 2)
4.HR Specialist (Recruitment) Regular -MMGS III 1 (भर्ती) नियमित -MMGS III 1)
5.Manager (Data Scientist) Regular – MMGS III 10 (प्रबंधक (डेटा वैज्ञानिक) नियमित - MMGS III 10)
6.Deputy Manager (Data Scientist) Regular - MMGS II 10 (उप प्रबंधक (डेटा वैज्ञानिक) नियमित - एमएमजीएस II 10)
7. Deputy Manager (System Officer) Regular – MMGS II 5 (उप प्रबंधक (सिस्टम ऑफिसर) नियमित - MMGS II 5)
8.Deputy Manager (Law)रिक्त पद 45
9.Senior Special Executive
10.Data Analyst- रिक्त पद 1
11. Senior Executive वरिष्ठ अधिकारी- रिक्त पद 1
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पात्रता
उमेदवार किमान कोणत्याही शाखेची विद्यापीठातून पदवी घेतलेला असावा. किमान 30 हजार रुपये महिना पगार पदांनुसार मिळणार आहे.
उमेदवाराला या अर्जासोबत 750 रुपये फी भरायची आहे. तर SC, ST उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. संपूर्ण देशभरात SBI कडून 8 हजार ज्युनियर असोसिएट पदांसाठी भर्ती सुरू आहे. याची अंतिम मुदत 26 जानेवारी आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment