![]() |
संजय राऊतांची हकालपट्टी करा :भिडे गुरुजी |
भिडे गुरुजी यांच्या या आवाहनानंतर हे आंदोलन आणखी चिघळणार अशी शक्यता आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांवर टीका केलीय. शिवसेनेला सत्तेचा अहंकार झाला असून त्या अहंकारातूनच हे वक्तव्य करण्यात आलंय. त्यांनी तातडीने यासाठी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही फडणवीस यांनी केलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी इस्लामपूरला एका कार्यक्रमासाठी येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत असताना शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष भिडे गुरूजी यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
संजय राऊत यांचा इशारा
उदयनराजे यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीला संजय राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. पण तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात, अशा शब्दांत राऊत यांनी उदयनराजे यांना सज्जड इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी पुण्यात बुधवारी झालेल्या लोकमतच्या एका कार्यक्रमात मुलाखतीनंतर गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजपच्या गोयल यांनी जेव्हा शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना केली होती तेव्हा बंद का पुकारला नाही असा सवाल त्यांनी भिडे यांना केलाय.
0 comments:
Post a Comment
Please add comment