सैफच्या 'जवानी जानेमन' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

सैफच्या 'जवानी जानेमन' चित्रपटाचं पोस्टर रिलीज


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्या आगामी 'जवानी जानेमन' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये सैफ अली खानचा फनी लुक पाहायला मिळतोय.

 पोस्टरसोबतच 'जवानी जानेमन'च्या ट्रेलरची तारीखही सांगितली आहे. उद्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केलं आहे.

 चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सैफ अली खान आणि आलिया फर्नीचरवाला दिसतेय. आलिया जमिनीवर बसली असून तिच्या हातात टेबल फॅन आहे. तर सैफ बाथरोबमध्ये सोफ्यावर पोज देताना दिसतोय.

 हा सिनेमा 31 जानेवारी 2020 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment