रिलायन्स इंडस्ट्रीजला ११,६४० कोटी रुपये निव्वळ नफा

रिलायन्स इंडस्ट्रीजला ११,६४० कोटी रुपये निव्वळ नफा


मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजने डिसेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये 
विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत या कंपनीला ११,६४० कोटी रुपये निव्वळ नफा झाला. कोणत्याही भारतीय कंपनीने नोंदवलेला हा सर्वोच्च तिमाही नफा आहे.

सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत या कंपनीने ११,२६२ कोटी रुपये नफ्याची नोंद केली होती. इंधन शुद्धीकरणासह रीटेल व्यापार व टेलिकॉम व्यवसायाने या कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाटा उचलला आहे. रिलायन्सच्या एकत्रित महसुलात मात्र या तिमाहीत चार टक्के घट नोंदवण्यात आली. डिसेंबरअखेरीस रिलायन्सने १,६८,८५८ कोटी रुपये महसूलप्राप्ति केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने आतापर्यंतचा कमावलेला सर्वाधिक नफा आहे. कंपनीला डिसेंबरच्या तिमाहीत ११ हजार ६४० कोटींचा नफा मिळाला. मात्र विक्रमी नफा मिळवून देखील कंपनीच्या महसुलात घसरण झाली आहे. तेल आणि रसायने उद्योगाच्या निराशाजनक कामगिरीने कंपनीच्या महसुलावर परिणाम जाणवला. तिसऱ्या तिमाहीत कंपनीला १६८८५८ कोटींचा महसूल मिळाला. ज्यात १.४ टक्के घसरण झाली. रिलायन्सने किरकोळ व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे. ३१ डिसेंबर २०१९ अखेर कंपनीवर ३०६८५१ कोटींचे कर्ज आहे. मार्च २०१९ अखेर रिलायन्सवर २८७५०५ कोटींचे कर्ज होते.

'जिओ'देखील अग्रेसर
रिलायन्स जिओनेदेखील या तिमाहीत दमदार कामगिरीची नोंद केली आहे. डिसेंबरअखेरच्या तिमाहीत जिओने १,३५० कोटी रुपये नफा कमावला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत जिओच्या नफ्यात ६२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जिओने ३.७ कोटी नवे ग्राहक जोडले.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment