WhatsAppवरील डिलीट झालेले मेसेज 'असे' परत मिळवा

WhatsAppवरील डिलीट झालेले मेसेज 'असे' परत मिळवा 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं WhatsAppचा देशामध्ये अनेक लोक वापर करतात. मेसेज पाठवण्यासाठी सर्वात उत्तम असलेलं WhatsApp अल्पावधीतच अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. वेळेनुसार WhatsAppने यूजर्ससाठी अनेक बदल केले आहेत. अनेकदा WhatsApp वापरताना चुकून आपल्याकडून महत्त्वाचे मेसेज डिलीट होतात. त्यानंतर आपल्याला समजत नाही की, तो मेसेज पुन्हा कसा रिकव्हर करू शकतो. आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.
जर तुमच्याकडून चुकून डिलीट झालेल्या मेसेज तुम्हाला पुन्हा मिळवायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चॅटचं बॅकअप घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही वेळोवेळी गूगल ड्राइव्हमध्ये बॅकअप घेतलं असेल तर तुम्ही डिलीट झालेल्या मेसेज पुन्हा मिळवू शकता. लक्षात ठेवा जर तुम्हाला माहित असेल की, तुमचा एखादा महत्त्वाचा मेसेज डिलीट झाला असेल तर फोन अजिबात अपडेट करू नका. WhatsApp मेसेज पुन्हा मिळवण्याची ही पहिली पायरी आहे. त्यानंतर तुमचं WhatsApp अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा.
-चॅट डिलीट झालं असेल तर WhatsApp अनइन्स्टल करा.
- आता प्लेस्टोअर वरून पुन्हा इन्स्टॉल करा.
- आपल्या जुन्या नंबरवरून WhatsApp सेटअप करा.
- शेवटी तुम्हाला बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी ऑप्शन मिळेल.
- रिस्टोअर वर क्लिक करा आणि मेसेज रिस्टोअर होतील.
- तुमचे डिलीट झालेले मेसेज आणि चॅट पुन्हा येतील.
लोकल बॅकअपच्या मदतीने डिलीट मेसेज पुन्हा मिळवता येऊ शकतात. ही पद्धत अन्ड्रॉइड फोनवरच वापरता येऊ शकते. WhatsApp दररोज रात्री दोन वाजता (नेट ऑन असेपर्यंत) डिव्हाइसमध्ये एक लोकल बॅकअपही तयार करण्यात येतं.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment