बाणेरमधील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीत भीषण आग


पुणे - पुण्यातील बाणेर परिसरातील पॅनकार्डच्या इमारतीवरील डोमला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण डोम जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीच्या प्रयत्नांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. ही आग कशी लागले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबची ही इमारत काही दिवसांपासून बंद होती. या इमारतीच्या माध्यमाद्वारे संपूर्ण राज्यभरात पॅनकार्डचा व्यवहार केला जातो. जवळपास 45 ते 50 फूट उंच इमारतीच्या या डोमला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीतील फायबरच्या समानामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोळ उठले आहेत.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment