लाहोर, 04 जानेवारी : क्रिकेटमध्ये खेळाडूंचा फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. क्रिकेटपटू सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे त्यांना तंदुरुस्त राहणे जेवढे कठिण असते तेवढेच गरजेचेही असते. त्यामुळं क्रिकेट बोर्डही आपल्या खेळाडूंच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असते. जगातील सर्वात फिट खेळाडू म्हणून भआरतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे पाहिले जाते. त्यामुळं सर्वच क्रिकेट बोर्ड खेळाडूंच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. मात्र आता क्रिकेट बोर्डानं एक अजब फतवा काढला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक नवीन फर्मान जारी केले आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की ज्या खेळाडूंचे पोट सुटले आहे त्यांना फिटनेस टेस्टमध्ये पास करणार नाही, त्याचबरोबर त्यांच्याकडून दंडही आकारला जाईल. पीसीबीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे 6 आणि 7 जानेवारी रोजी फिटनेस चाचणी चार टप्प्यात घेण्यात येईल, ज्यामध्ये पाकिस्तानचे सामर्थ्य व कंडिशनिंग प्रशिक्षक यासिर मलिक खेळाडूंची चाचणी घेतील.तंदुरुस्ती चाचणीमध्ये जाडेपणा, सामर्थ्य, सहनशक्ती, गती व सहनशक्ती आणि क्रॉस फिट अशा पाच क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. प्रत्येक खेळाडूकडे समान लक्ष दिले जाईल.
या निवेदनात म्हटले आहे की, "जे खेळाडू किमान फिटनेसदेखील पास करू शकले नाहीत त्यांना त्यांच्या मानसिक वेतनाच्या 15 टक्के दंड आकारला जाईल आणि जोपर्यंत ते किमान प्रमाणात साध्य करेपर्यंत सुरू ठेवतील." याआधी वर्ल्ड कपमध्ये पाक संघाचा माजी कर्णधार सरफराजला फिटनेसवरून ट्रोल करण्यात आले होते. याआधी पीसीबीने खेळाडूंवर बिर्याणी बंदीही लादली होती. त्यामुळं आता पुन्हा फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी पीसीबीनं कडक नियमांची अंमलबजावणी केली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment