पाँडिचेरी, 04 जानेवारी : एखाद्या मंत्र्याकडे पैसे नाहीत किंवा उधारी बाकी आहे म्हटलं तर त्यात नवल वाटणार नाही. पण आता एक असा प्रकार समोर आला आहे की पेट्रोल पंपावर सरकारची उधारी शिल्लक असल्यानं पंपचालकाने चक्क मंत्र्यांच्या गाडीत तेल भरण्यास नकार दिला. यामुळे मंत्रिमहोदयांना चक्क बसने प्रवास करावा लागला. हे पाँडिचेरीत बघायला मिळालं आहे. इथले कृषीमंत्री आर कमलाकन्नन यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यास नकार देण्यात आला कारण सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोलचे पैसे दिले नव्हते.
आर कमलाकन्नन हे शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कराईकल इथून पाँडिचेरीला जात होते. त्यांच्या कारने जाण्याचे नियोजन होते पण त्यात तेल नसल्यानं पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले. त्या ठिकाणी पंपावर त्यांना पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला. कारण पेंट्रोल पंपांना सरकार अडीच कोटी रुपये देणं बाकी आहे. यातील जवळपास 50 लाख रुपये हे मंत्र्यांचे आहेत. पेट्रोल पंपांनी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही दिलेले नाही असं मंत्रिमहोदयांना ऐकवण्यात आलं.

0 comments:
Post a Comment
Please add comment