निर्भया प्रकरण - वकील इंदिरा जयसिंह म्हणाल्या- निर्भयाच्या आईने दोषींना माफ करावे

निर्भया प्रकरण - वकील इंदिरा जयसिंह म्हणाल्या- निर्भयाच्या आईने दोषींना माफ करावे


वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला अपील केली आहे की, '2012 मध्ये निर्भयाच्या गँगरेप आणि हत्येचे दोषी असणाऱ्यांना माफ करावे. त्यांच्यासाठी मृत्यूची शिक्षा मागू नये.' यावर निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, 'त्या असा सल्ला देणाऱ्या आहेत कोण, देवा देखील येऊन म्हणाला तरीही मी त्यांना माफ करणार नाही.' यापूर्वी आशा देवी यांनी शुक्रवारी दिल्ली कोर्टाद्वारा निर्भयाच्या आरोपींचे डेथ वॉरंटची तारीख पुढे ढकल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, 'जे लोक 2012 मध्ये महिला सुरक्षेच्या घोषणा देत रॅल्या काढत होते होते, ते आता आपल्या राजकीय फायद्यासाठी आरोपींना शिक्षा देण्यासाठी विलंब करत आहेत.
यावर इंदिरा यांनी ट्वीट केले, ‘‘मी आशा देवी यांचा त्रास पूर्णपणे समजू शकते. पण मी त्यांना अपील करते की, त्यांनी सोनिया गांधींचे अनुसरण करावे. ज्यांनी नलिनी (माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील आरोपी) ला माफ केले होते. त्या तिच्यासाठी मृत्यूची शिक्षा इच्छित नाही. आम्ही सर्वजांना तुमच्यासोबत आहोत, पण मृत्यूच्या शिक्षेच्या विरुद्ध आहोत.’’
इंदिरा जयसिंह यांच्यासारख्या लोकांमुळेच न्याय मिळू शकत नाही : आशा देवी
इंदिरा जयसिंह यांच्या वक्तव्यावर आशा देवी म्हणाल्या, “मला असा सल्ला देणारी इंदिरा जयसिंह आहे कोण ? संपूर्ण देशाची इच्छा आहे की, आरोपींना फाशी मिळावी. त्यांच्यासारख्या लोकांमुळे पीडित मुलींना न्याय मिळत नाही. विश्वास बसत नाही की, त्यांनी असा सल्ला मला दिला. मी सुप्रीम कोर्टात त्यांना अनेक वर्षे भेटले. त्यांनी एकदाही माझा विचार केला नाही आणि आज त्या आरोपींची बोलत आहेत. असे लोक नराधमांच्या समर्थन करून आपले पोट भारतात. त्यामुळेच रेपसारख्या घटना घटना बंद होत नाहीयेत.”





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment