राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्य्क व्यावस्थापक (ग्रेड-ए) पदांच्या १५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ बी.ई./ बी.टेक./एम.बी.ए./ बी.बी.ए./ बी.एम.एस./ पदव्युत्तर पदविका/ सी.ए. अर्हता धारक असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण असणे आवश्यक) किंवा ५०% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता धारक (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार किमान उत्तीर्ण असावेत) किंवा ५०% गुणांसह एल.एल.बी. किंवा ४५% गुणांसह एल.एल.एम.अर्हता धारक किंवा वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात/ नौदल/ हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवा केलेला अधिकारी असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२० रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/-रुपये आहे.
परीक्षा – दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment