खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. भारतातील मुस्लिमांची काळजी इम्रान खान यांनी करू नये. आपला देश त्यांनी सांभाळून तेथील शिखांची काळजी घ्यावी, असे ओवेसी म्हणाले.
भारतातील मुस्लिमांची काळजी इम्रान खान यांनी करू नये, आपला देश त्यांनी सांभाळावा. आमचे संविधान हेच आमच्यासाठी देव असून तुमच्या देशाची तुम्ही काळजी करा.
पाकमध्ये जो हल्ला शिखांवर झाला त्याकडे लक्ष द्यावे, आम्ही मोहम्मद अली जीना यांचा सिद्धांत नाकारला आहे. आम्ही भारतीय असल्याचा गर्व आहे, असेही ओवेसी म्हणाले.
देशात नागरिकत्व सुधारणा आंदोलनावरून सुरु असलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ म्हणून त्यांनी बांगलादेशातील व्हिडिओ शेअर केला होता.
0 comments:
Post a Comment
Please add comment