वसईत निसर्गाचा चमत्कारवसईत निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला आहे. वसईच्या गास गावात कोंबडीने उबवलेल्या अंड्यात एक चार पायांच्या कोंबडीचा जन्म झाला आहे. हे कोंबडीचे पिल्लू पाहून तिचा मालकही अवाक झाला आहे. अशा आगळ्या वेगळ्या प्रकारच्याही कोंबडीच्या पिल्लाला पाहायला  बघ्यांची गर्दी जमत आहे, दरम्यान या कोंबडीची  चर्चा संपूर्ण वसईत रंगली आहे.
गास गावात राहणाऱ्या कॉर्नेलियस पास्कोल अल्फान्सो यांच्या घरात 29 डिसेंबर 2019 रोजी एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला. त्यांच्या एका कोंबडीने उबवलेल्या अंड्यातून एका चार पायाचा पिल्लाचा जन्म झाला आहे. ही कोंबडी सर्वसामान्य कोंबडी पेक्षा अतिशय वेगळी आहे. सर्वसामान्य कोंबडीप्रमाणे या पिल्लाला दोन पंख, दोन डोळे, आणि चोच आहे पण नवल म्हणजे या कोंबडीच्या पिल्लाला चक्क चार पाय आहेत. यातील पुढे दोन पाय आणि मागच्या बाजूला आहेत. अशाप्रकारच्या काही क्वचितच घटना घडतात.
या कोंबडीचे मालक कोर्नेलीस अल्फान्सो या कोंबडीची जास्त काळजी घेत आहेत, कारण या कोंबडीला इतर कोंबड्याप्रमाणे चालता येत नाही. तसेच विशेष काळजी ही घेतली जात आहे. दरम्यान त्यांनी या कोंबडीच्या पिल्लाची आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली आहे. पण या पिल्लाला स्वताच्या पायावर उभे राहता येत नसल्याने त्याला खाता येत नाही यामुळे मालकाला त्याला दाने भरवावे लागत आहेत. यामुळे हे पिल्लू जगेल कि नाही याची शाश्वती देता येत नाही. पण या पिल्लाला जगवण्यासाठी मालकाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
अल्फान्सोनी यासंदर्भात अतिशय रंजक कथा सांगितली आहे. त्यांनी सांगितले कि, त्या दिवशी मी दुपारी झोपलो होतो. त्यावेळी मला आमच्या कोंबडीने चार पायाचे पिल्लू दिल्याचे स्वप्नात आले. त्यांनतर मला जाग आल्यावर मी कोंबडीच्या ठिकाणी जाऊन पाहिल्यावर तिने अंड्यातून १० पिल्ले काढली होती. त्यामध्ये तिने एका चार पायाच्या पिल्लाला जन्म दिला होता. हि घटना पाहूणच मी आच्छर्यचकीत झालो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment