यूएस आणि ब्राझिलियनच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. जो नेचर जर्नलमध्ये (Nature) प्रसिद्ध करण्यात आला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ साओ पॉलो आणि हार्वर्डच्या संशोधकांनी उंदरावर प्रयोग केला. त्यांना दिसून आलं की,
स्ट्रेस असलेल्या उंदरामधील adrenaline आणि cortisol या हार्मोन्सची निर्मिती वाढली.
ज्यामुळे हृदयाचे ठेके जलद झाले आणि रक्तदाब वाढला, याचा परिमाम नर्व्हस सिस्टमवर झाला.
या प्रक्रियमुळे हेअल फॉलिकल्समध्ये मेलानिनची निर्मिती करणाऱ्या मेलनोसाईट स्टिम सेल्सचा वेग मंदावला.
मेलानिनमुळे केस आणि त्वचेला रंग मिळतो आणि त्यावर परिणाम झाल्याने केसांचा रंग पांढरा झाला.
स्ट्रेसमुळे केस पांढरे होतात, हे संशोधकांनी दाखवून दिलं. ताणामुळे केस पांढरे होण्याच्या प्रक्रियावर काय उपचार करता येईल, यादृष्टीने आता संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यावर उपाय मिळले, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र सध्या तरी यावर काही औषध नाही, त्यामुळे तरुण वयात केस काळे ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं.
0 comments:
Post a Comment
Please add comment