![]() |
गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवली |
मुकेशने दया याचिकेचा हवाला देऊन ट्रायल कोर्टाकडून 22 जानेवारीच्या डेथ वॉरंट रद्द करण्याची मागणी केली आहे. ट्रायल कोर्टाने तिहार प्रशासनाला दोषींना ठराविक तारखेला फाशी दिली जाण्याच्या परिस्थितीवर शुक्रवारपर्यंत रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले होते.
गृह मंत्रालयाने निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक मुकेश सिंह याची दया याचिका गुरुवारी रात्री राष्ट्रपतींकडे पाठवली. मुकेशने हायकोर्टाकडून याचिका फेटाळल्या गेल्यानंतर राष्ट्रपतींना दया याचिका पाठवली होती. तर पीडितेची आई आशा देवी शुक्रवारी म्हणाल्या, “आतापर्यंत मी कधीही राजकारणाबद्दल बोलले नव्हते, पण मी म्हणू इच्छिते की, जे लोक 2012 मध्ये रस्त्यावर उतरायचे, आज तेच लोक मुलीच्या मृत्यूवर राजकीय फायद्यासाठी खेळ खेळत आहे.’’
दिल्ली सरकारने दया याचिका रद्द करण्याची शिफारस करत ती उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे पाठवली. उपराज्यपालांनीही केंद्रीय गृह मंत्रालयाला याचिका फेटाळण्याची शिफारस केली आहे. मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, दया याचिकेवर लवकरच निर्णय घेतला जाईल
पटियाला हाउस कोर्टाने 7 जानेवारीला निर्भयाच्या चारही आरोपी अक्षय, पवन, मुकेश आणि विनयविरुद्ध डेथ वॉरंट जारी केले होते. या वॉरंट मध्ये म्हणले गेले होते की, आरोपींना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार जेलमध्ये फाशी दिली जावी. यानंतर दोन आरोपी मुकेश आणि विनयने सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल केले. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दोन याचिका रद्द केल्या होत्या. एक दोषी मुकेशने राष्ट्रपतींना दया याचिका पाठवली, दिल्ली हायकोर्टाकडून डेथ वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. हायकोर्टाने याची याचिका फेटाळत खालच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment