![]() |
मिलिंद देवरांच्या पत्रामुळे पक्षात खळबळ |
उद्धव ठाकरे सरकारमध्ये सगळच काही आलबेल नाही हे आता पुढं येतंय. नेत्यांचं मानापमान, वक्तव्य यामुळे कुरबुरी सुरूच आहेत. असं असतानाच मिलिंद देवरांनी लिहिलंय की, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. सरकारमध्ये शिवसेना आणि एनसीपी पक्ष त्यांचे अजेंडे पूर्ण करत आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही जनतेला दिलेल्या आश्वासन याची पुर्तता करण्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. निवडणुकीच्या काळात पक्षाने जनतेला जी आश्वासन दिली होती त्याची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा वेगात केला पाहिजे असंही त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे.
शिवसेनेने 10 रुपयांमध्ये शिवथाळी, कोस्टलरोड, कर्जमाफी अशा योजना तर राष्ट्रवादीने इंदू मील आणि इतर अनेक प्रश्नांवर निर्णय घेत आपलं अस्तित्व ठळपणे दिसेल अशी काळजी घेतलीय. मात्र आतापर्यंत काँग्रेसच्या मंत्र्यांनी एकही मोठा निर्णय घेतल्याचं पुढे आलं नाही.
परस्थिती अशीच राहिली तर त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो असा सूचक इशाराच देवरा यांनी सोनिया गांधींना दिला आहे. त्यामुळे यापुढच्या काळात काँग्रेस हायकमांडकडून काँग्रेसच्या मंत्र्यांना खास निर्देश मिळतील अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.
0 comments:
Post a Comment
Please add comment