मुंबईतील 'स्टेट ऑफ द आर्ट कारडेपो'
दहिसर ते डी. एन. नगर, डी. एन. नगर ते मंडाळे व दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असे तीन मेट्रो मार्ग एमएमआरडीए उभारत असून, या मार्गांसाठीची बांधकामेही सुरू झाली आहेत. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर व हार्बर मार्ग असे तीन विभाग या मेट्रो मार्गांनी जोडले जाणार आहेत. त्यामुळे तिन्ही विभागातील दळणवळण अधिक जलद होणार आहे. मंडाळेच्या पुढे हे मार्ग भविष्यात नवी मुंबई मेट्रोलाही जोडले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई व नवी मुंबईतील अंतर अधिक कमी होऊन प्रवास जलद होईल.
तिन्ही मेट्रो मार्गांसाठी एकच कारडेपो असेल. आठ डब्यांच्या ७१ गाड्या 'पार्क' करण्याची सुविधा डेपोत उपलब्ध असेल. म्हणजे तब्बल ५७६ डबे येथे सामावू शकतात. गाड्यांची दैनंदिन देखभाल तसेच दुरुस्तीसाठी नऊ अद्ययावत वर्कशॉप असतील. या वर्कशॉपमध्ये आठ व सहा डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. गाड्या धुतल्यानंतर दूषित पाण्यावर प्रक्रिया तसेच पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्पही या डेपोत असेल. गाड्या धुण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असेल. गाड्या उभ्या करण्यासाठी डेपो अंतर्गत तब्बल २७ किमीचा ट्रॅक असेल. हा कारडेपो दुमजली असेल.
0 comments:
Post a Comment
Please add comment