![]() |
मनसेनें नव्या भगव्या झेंड्याचं अनावरण केले |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. आज राज ठाकरे आपली भूमिका मांडणार असून ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सक्रीय राजकारणात एण्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. अधिवेशनाआधी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी याबाबत बोलण्यास मात्र नकार दिला आहे. 'अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार का?' असा प्रश्न विचारल्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, 'माहीत नाही. पण झालंच तर आनंद होईल. अधिवेशनाबाबत मोठा सस्पेन्स आहे.'
दरम्यान, राज ठाकरे हे महाअधिवेशनात भाषण करतील. त्यामुळे राज ठाकरे हे नवीन पक्षाची काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहणार असल्याची माहिती आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरला अधिवेशनासाठी 20 ते 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment