मकरसंक्रांतीचा सण यावर्षी 14 नाही तर 15 जानेवारीला साजरा केला जाईल. ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार 14 जानेवारीला मध्यरात्रीनंतर 2 वाजून 21 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. यामुळे सूर्योदय व्यापिनी तिथीमध्ये हा सण 15 जानेवारीला साजरा केला जाईल. सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश म्हणजेच मकरसंक्रांती. यावर्षी मकरसंक्रांतीला सूर्य आणि बुध एकत्र आल्यामुळे बुधादित्य योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त, उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे वर्धमान नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे.
पं भट्ट यांच्यानुसार वर्षभरात 12 संक्रांती असतात परंतु मकरसंक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवसापासून सूर्यदेव उत्तरायण होतात. जेव्हा सूर्य मकर राशीतून मिथुन राशीपर्यंत भ्रमण करतो तेव्हा उत्तरायण राहते आणि त्यानंतर कर्कपासून धनु राशीपर्यंत दक्षिणायन राहते. मकरसंक्रांतीपासून देवतांचा दिवस आणि दैत्यांची रात्र चालू होते. यामुळे विवाह, गृहप्रवेश, यज्ञोपवीत, मूर्ती स्थापना यासारखे शुभकार्य मकरसंक्रातीपासून सुरु होतात.
- दानाचे महत्त्व
15 जानेवारी 2020 ला विशेष पुण्यकाळ 8 वाजून 14 मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत राहील. पुण्यकाळ काळात तीर्थस्नान, दान, जप, हवन, तुलादान, गोदान, स्वर्ण दानाचे विशेष महत्त्व आहे. गरिबाला गरम कपडे, ब्राह्मणांना खिचडी तसेच तिळगुळाचे पात्र भरून दान केल्याने शुभफळाची प्राप्ती होते. स्नानानापूर्वी शरीरावर तिळाचे उटणे लावून स्नान केल्याने आरोग्य वृद्धी होते.
- 12 राशींवर संक्रांतीचा प्रभाव
- मेष राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचे योग आहेत.
- वृषभ राशीच्या लोकांना कार्यसिद्धीमधून लाभ होईल.
- मिथुन राशीच्या लोकांना विजय प्राप्त होईल.
- कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक नुकसानीचा काळ आहे.
- सिंह राशीच्या लोकांना शुभ वार्ता मिळू शकते.
- कन्या राशीच्या लोकांना आत्मसंतोष मिळेल.
- तूळ राशीच्या लोकांना धनलाभ होईल.
- वृश्चिक राशीचे लोक कलह आणि वादामुळे त्रस्त राहतील.
- धनु राशीच्या लोकांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल.
- मकर राशीच्या लोकांचे यश आणि कीर्ती वाढेल.
- कुंभ राशीच्या लोकांना सन्मान मिळेल.
- मीन राशीचे लोक भयग्रस्त राहू शकतात.
0 comments:
Post a Comment
Please add comment