महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बॅंका, जिल्हा मध्यवर्ती, ग्रामीण बॅंकांबरोबरच खासगी बॅंकांकडील 2 लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे पीककर्जही माफ होणार आहे.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत खासगी बॅंकांचा समावेश नव्हता. आता अशा बॅंकांचा समावेश झाल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
नव्या कर्जमुक्ती योजनेमुळे राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे अनिवार्य आहे.
ही प्रक्रिया राबविताना शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेने वेठीला धरू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment