प्रत्यक्षात वीज दरवाढीचा प्रस्ताव थेट 20 टक्के

प्रत्यक्षात वीज दरवाढीचा प्रस्ताव थेट 20 टक्के

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठी दाखल केली आहे. वीज दरवाढीच्या प्रस्तावात सरासरी 1 ते 5 टक्के वाढ दर्शविल्याचे महावितरणचे म्हणणे असले तरी, प्रत्यक्षात मात्र हा वीज दरवाढीचा प्रस्ताव थेट 20 टक्के असल्याचे म्हणणे वीजतज्ज्ञ आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी मांडले आहे.


 परिणामी हा वीज दरवाढीचा प्रस्ताव सरकारसह वीज ग्राहकांनी फेटाळून लावावा, असे म्हणत होगाडे यांनी वीज दरवाढीच्या प्रस्तावावर टीका केली आहे.

बहुवार्षिक दरवाढीचा प्रस्ताव : महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक म्हणजे 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24 आणि 2024-25 असा वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे.

 आयोगाने महावितरणची ही वीज दरवाढीची याचिका 13 जानेवारीला दाखल करून घेतली असून, महावितरणने उच्चदाब, लघुदाब वीज ग्राहकांसह उद्योग आणि कृषी वीज ग्राहकांनाही झटका दिला आहे.

 महावितरणने दाखल केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर वीज ग्राहकांकडून सूचना व हरकती मागविण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. 4 फेब्रूवारीपर्यंत सूचना व हरकती आयोगाच्या कफ परेड येथील वर्ल्ड टे्रड सेंटरच्या कार्यालयात पाठवाव्यात. दरम्यान, महावितरणचे संपुर्ण राज्यासह मुंबईतल्या भांडूप आणि मुलुंडमध्येही वीज ग्राहक आहेत.


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment