LIC ची जीवन प्रगती योजना, रोज खर्च करा 200 रुपये आणि मिळतील एवढे पैसे

LIC ची जीवन प्रगती योजना

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने एक खास पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीचा शेअर मार्केटशी काहीही संबंध नाही. यात पॉलिसी घेणाऱ्यांना चांगले फायदे मिळतात. तुम्ही रोज 200 रुपये गुंतवणूक केलीत तर 20 वर्षांनंतर ग्राहकांना 28 लाख रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये 15 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन दिली जाते. या योजनेनुसार, दुर्घटनेत मृत्यू झाला झाला तर किंवा अपंगत्व आलं तर याचा लाभ घेता येऊ शकतो.
LIC जीवन प्रगती योजनेचे लाभ
ही पॉलिसी घेणारा ग्राहक पूर्ण पॉलिसीच्या काळात हयात असेल तर या योजनेच्या शेवटी मूळ रक्कम आणि जमा झालेला बोनस, फायनल एडिशन बोनस अशी सगळी रक्कम मिळू शकते.
त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास

जर पॉलिसीच्या काळात पॉलिसी घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला विम्याची रक्कम, सिंपल रिव्हर्सनरी बोनस, फायनल एडिशन बोनस असं सगळं दिलं जाईल.
एडिशन बोनस
या योजनेत तुम्हाला LIC तर्फे योजनेच्या शेवटी जादा बोनस दिला जातो. हा एक प्रकारचा लॉयल्टी बोनस असतो. LIC ची योजना दीर्घकाळासाठी घेतल्याचा फायदा म्हणून हा बोनस दिला जातो.
प्रगती योजनेची सरेंडर व्हॅल्यू
LIC पॉलिसीधारकाने 3 वर्षांपर्यंत प्रिमियम भरला असेल तर तो ती पॉलिसी सरेंडर करू शकतो आणि त्याचं मूल्य त्याला मिळू शकतं. त्यामुळे ही योजना फायदेशीर आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment