![]() |
केवायसी प्रक्रिया करता येणार व्हिडीओद्वारे |
भारतीय रिझर्व्ह बँकने ग्राहकांसाठी एक विशिष्ट सुविधा आणली आहे.
आरबीआयने म्हटले: आता बँक आपल्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया व्हिडीओद्वारे देखील करता येणार आहे.
त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
त्यासाठी वारंवार बँकेत चकरा मारण्याची गरज असणार नाही. केवायसी प्रक्रिया मोबाईल व्हिडीओद्वारे संवाद साधून देखील करता येणार आहे. त्यामुळे केंद्रीय बँके अंतर्गत येणाऱ्या बँकाना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरबीआयने आधार व इतर ई-कागदपत्रांद्वारे ई केवायसी आणि डिजिटल केवायसीची सुविधा दिली आहे. या निर्णयाने ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना मोठी मदत होऊन खर्चातदेखील बचत होणार आहे.
मोबाईल व्हिडीओच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक संस्थेचा अधिकारी पॅन किंवा आधार कार्ड व काही प्रश्नांद्वारे ग्राहकांची ओळख करणार आहे. ग्राहकाचे लोकेशन देखील ट्रेस केले जाणार आहे.
महत्वाचे : हा व्हिडीओ कॉल संबंधित बँकेच्या डोमेनद्वारेच केला जाणार असून गुगल ड्युओ किंवा व्हॉट्सअॅप द्वारे ही प्रक्रिया होणार नाही.
0 comments:
Post a Comment
Please add comment