कुक्कुटपालन – हिवाळी व्यवस्थापन


 कृषी व्यवस्थेत शेती सोबत केला जाणारा महत्वाचा जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन ओळखले जाते.

 हवामानानुसार कुक्कुट पक्षांच्या व्यवस्थापन यंत्रणेत बदल करणे आवश्यक आहे. ह्या लेखातून आपण जाणून घेवू हिवाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे करावे ?

1) पक्षी येण्याअगोदर शेडमधील ब्रुडर एक ते दोन तास अगोदर चालु करावेत. पक्षी संध्याकाळी येत असेल तर पक्षांना पिण्यासाठी कोमट पाणी वापरावे.

2) खादय पेपरवरती किमान 2 दिवस दयावे.त्यासाठी रददी पेपरची व्यवस्था करावी.पहिला पेपर खराब झाल्यास दुसरा पेपर टाकावा.

3) गुळपाणीफक्त 2 तासच दयावे त्यानंतर लगेच पक्षांबरोबर आलेली औषधे वापरावीत.

4) हिवाळयामध्ये थंडी जास्त असल्यामुळे पक्षांना ऊब देणे गरजेचे असतेत्यासाठी प्रति चिकगार्ड एक कोळशाची शेगडी वापरणे अनिवार्य आहे. प्रति 1000 पक्षांसाठी 100 किलो दगडी कोळसा किवां लाकडी कोळसा वापरावा. संध्याकाळी 6 वाजता शेगडया पेटवाव्यात व रात्री शेगडया व बॅरल चालु ठेवावेत.

5) शेडमध्ये 32 ते 35 डीग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान ठेवावेत्यासाठी डिजीटल थर्मामीटरचा वापर करावा.

6) हिवाळयामध्ये थंडी असल्यामुळेपाणी पिण्याचे प्रमाण कमी होते व गाउट होण्याचा धोका असतो. दर दोन तासांनी शेडमध्ये चक्कर मारावी.तसेच पाण्यामध्ये ई – कोलायचे प्रमाण वाढते त्यासाठी डिऑक्स अॅक्टीवेटर पहिल्या दिवसापासुन 100 मिलि प्रति 1000 लिटरसाठी वापरावे.

7) पाण्याच्या टाक्या पहीले 12 दिवस अर्ध्यापर्यंतच भराव्यात त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण योग्य रितीने वापरावे.

8) हिवाळयात थंडीसाठी अर्धे शेड सिलिंग करुन घ्यावे.

9) ब्रुडिंगसाठी डबल पडदा वापरावा तसेच आडवा पडदा पहिले 7 दिवस काढू नये.

10) हिवाळयात पक्षी लार्इटकडे आकर्षीत होतो त्यामुळे लार्इटचे ब्रुडर कोप­ऱ्यावर किंवा पार्टीशनच्या वर लावू नयेत. पक्षी गोळा होऊन मरतुक होण्याचा धोका असतो.

11)ब्रुडिंगसाठीचे पडदे वेगळे असावेत दूस­या शेडचे पडदे सोडुन सिलिंग किंवा ब्रुडिंग करू नये. तसेच त्या पडदयांचा इतरत्र वापर करू नये.

12) शेडमध्ये अमोनियाचे वास येणार नाही याची काळजी घ्यावी.शेडमधील अमोनियाच्या वासाने पक्षांचे खादय खाण्याचे प्रमाण कमी होते व सी आर डी चा धोका संभावतो.त्यासाठी पडदयाची वरून उघडझाप करावी तसेच आतील व मधला पडदा दिवसा गुंडाळून ठेवावा, शेडमध्ये स्वच्छ हवा व भरपूर उजेड असावा.

13)ब्रुडिंगमध्ये तुस प्रति 1000 स्क्वेअर फूटसाठी 300 किलो प्रमाणे वापरावी.दिवसा पडदे वातावरणातील तापमानानुसार ठेवावेत.

14) ऑक्टोबंर ते डिसेंबर महिन्यामध्ये दक्षिण बाजुने ऊन तिरके शेडमध्ये येते त्यासाठी योग्य मांडव करून घ्यावा.


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment