या हल्ल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहीले, “इराक सरकारचे शत्रु अनेकवेळा स्वायत्तेचा गैरफायदा घेत आहेत, आता हे बंद व्हायला पाहीजे."
9 जानेवारीला ग्रीन झोनमध्ये मिसाइ हल्ला
बगदादच्या आंतरराष्ट्रीय परिसरात जिथे अमेरीकी दूतावास आहे, तिथे गुरुवारी मिसाइल हल्ला करण्यात आला. यामुळे परिसरात दोन मोठे विस्फोट झाले.अमेरिकेने यामागे इराकमधील इराण समर्थित शिया विद्रोही संघटना ‘हाशेद’ ने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला.
इराणने 7 जानेवारीला इराकमधील दोन अमेरिकी सैन्य ठिकाणांवर 22 मिसाइल हल्ले केले होते. त्यानंतर यात 80 अमेरीकी सैनिक मेल्याचा दावा इराणने केला होता. पण, अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी या दाव्याचे खंडन केले.
कासिम सुलेमानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणनेचे हल्ले
अमेरिकेने 3 जानेवारीला इराणच्या कुद्स सेनेचा जनरल कासिम सुलेमानीला रॉकेट हल्ला करुन ठार मारले होते. त्यानंतर इराणने अमेरीकेला बदला घेण्याची धमकीही दिली होती. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, इराणी कमांडर जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या चार दूतावासांना निशाना बनवणार होता.
0 comments:
Post a Comment
Please add comment