![]() |
इन्स्टाग्राम मद्दे मोठे बदल |
इन्स्टाग्रामच्या वेबसाइटवरून यूजर्सना डायरेक्ट मेसेज पाठवता येणार आहेत. मोबाइलपेक्षा संगणक किंवा लॅपटॉपवरून इन्स्टाग्रामचा अॅक्सेस लवकर मिळतो. त्यामुळे मेसेज लवकर पाठवणं सोपं जातं. वेबवर मिळणारं डायरेक्ट मेसेज फिचर स्मार्टफोन अॅपवर मिळणाऱ्या डीए सारखंच असेल. त्यामुळे यूजर्स वेबवरही ग्रुप्स तयार करू शकतील. फोटो पोस्ट करू शकतील आणि वेब चॅटींगही करू शकतील. फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरही मेसेंजर आणि चॅट विंडो आहेत, असं कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं.
इन्स्टाग्राम यूजर्ससाठी चांगली बातमी आहे. आतापर्यंत मोबाइलवरूनच इन्स्टाग्राम मेसेज पाठवण्याची सुविधा होती. त्यामुळे ग्राहकांना मोबाइलशिवाय पर्याय नसायचा. मात्र आता लवकरच इन्स्टाग्राम मेसेज संगणक आणि लॅपटॉपवरूनही पाठवणं शक्य होणार आहे. कंपनीने त्याबाबतचं नवं फिचर्स आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्र आणि कार्पोरेट ऑफिसमधील यूजर्सची गैरसोयीतून सुटका होणार आहे.
विशेष म्हणजे वेबवरून थेट मेसेज पाठवल्यानंतरही यूजर्सना नोटिफिकेशन्स मिळणार आहेत. मात्र इन्स्टाग्रॅम अॅपवरून ज्याप्रमाणे व्हिडिओ पाठवण्याची आणि घेण्याची सुविधा आहे, तशी सुविधा वेबवर मिळणार नसल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं. गेल्यावर्षीच फेसबुकने मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम डायरेक्ट सारखे सोशल मीडिया अॅप्सचं विलिनीकरण करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. यूजर्सना सर्व प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी काम करता यावं यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला होता. त्यावर कामही सुरू असल्याचं फेसबुकनं म्हटलं होतं.
0 comments:
Post a Comment
Please add comment