श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खराब हवामानामुळे घुसखोरी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बालाकोट भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्याप्रमात बर्फवृष्टीसुरु आहे. बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच खराब हवामानाचा फायदा घुसघोर घेऊ शकतात. लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी निसार डारला अटक करण्यात आली असून जम्मू-काश्मीरममध्ये सुरक्षादलाला मोठं यश आलंय. याआधी झालेल्या एनकाऊंटरमध्ये सुरक्षारक्षकांना चकवून निसारने पळ काढला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या चकमकीत अखेर निसारला पकडण्यात सुरक्षादलांना यश आलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment