पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जागितक माध्यमांमध्ये सतत चर्चेत असतात पण गेले काही दिवस मात्र पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना माध्यमांनी चांगलंच लक्ष्य केलं आहे.
माझ्याबद्दल माध्यमं नकारात्मकता पसरवत आहेत, असं म्हणत त्यांनी माध्यमांवरच बहिष्कार टाकला आहे. सध्या मी वर्तमानपत्रं वाचणं आणि टीव्हीवरचे डिबेट शो पाहणं बंद केलंय, असं इम्रान खान यांनी सांगितलं.
आम्ही पाकिस्तानमध्ये संस्थात्मक आणि प्रशासकीय पातळीवरच्या सुधारणा करत आहोत पण सुधारणा होतानाच्या वेदना असतातच. तुम्हाला स्वर्गात तर जायचं असतं पण मरायची इच्छा नसते, तसंच हे आहे, असं ते म्हणाले.दाओसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) या परिषदेत सहभाग घेण्यासाठी इम्रान खान दाओसला पोहोचले आहेत. पाकिस्तानच्या आर्थिक प्रगतीच्या अनंत शक्यता आहेत, असं इम्रान खान यांनी सांगितलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment