आयसीआईसीआय बँकेची माजी एमडी चंदा कोचर यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप

माजी एमडी चंदा कोचर 

व्हिडिओकॉन कंपनीला स्वतःचे हितसंबंध जपत मोठे कर्ज मंजूर केल्याचा ठपका असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली. कोचर यांचे मुंबईस्थित निवासस्थान व पती दीपक कोचर यांच्या कंपनीची काही मालमत्ता जप्त करण्यात आली. याची एकूण किंमत ७८ कोटी आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी ही कारवाई झाली. पती दीपक कोचर यांना फायदा व्हावा या हेतूने व्हिडिओकॉन कंपनीवर मेहरनजर दाखवत मोठे कर्ज मंजूर करण्यात आल्याच्या आरोपावरून चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment