ICICI Bank ने मंगळवारी ATM मधून 'कार्डलेस कॅश विड्रॉल' सेवेची घोषणा

ICICI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. ICICI Bank ने मंगळवारी ATM मधून 'कार्डलेस कॅश विड्रॉल' (Cardless Cash Withdrawal)च्या सेवेची घोषणा केली.

 ICICI Bank ने मंगळवारी ATM मधून 'कार्डलेस कॅश विड्रॉल' सेवेची घोषणा
ICICI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे.  ICICI Bank ने मंगळवारी ATM मधून 'कार्डलेस कॅश विड्रॉल' (Cardless Cash Withdrawal)च्या सेवेची घोषणा केली. यामध्ये ग्राहक बँकेच्या i mobile या अॅपमधून 15 हजार रुपयांपेक्षा जास्त कॅश ATM मधून काढू शकतात. डेबिट कार्डचा उपयोग न करताही पैसे काढण्याची ही एक सोपी पद्धत आहे. या सुविधेनुसार रोजच्या व्यवहारांची सीमा 20 हजार रुपये इतकी ठरवण्यात आली आहे.
ICICI बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी सांगितल्यानुसार, ICICI बँक सुरुवातीपासूनच डिजिटल व्यवहारांमध्ये अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून Cardless Cash Withdrawal चा फायदा ग्राहकांना होऊ शकतो. हे व्यवहार सुरक्षितही आहेत.डेबिट कार्डचा वापर न करता पैसे काढणं हे ICICI च्या ग्राहकांसाठी नवा अनुभव आहे.  ICICI बँकेचे सगळे चॅनल्स आणि टच पॉइंट्समध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर लक्ष द्यावं लागेल आणि ग्राहकांना बँकेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
असे काढा पैसे-
  • i mobile अ‍ॅपमध्ये लॉग इन करा आणि सर्व्हिस अँड कॅश विड्रॉल अ‍ॅट ICICI बँक ATM चा पर्याय आहे.
  • अमाउंट टाका, अकाउंट नंबर निवडा, 4 आकडी तात्पुरता पिन बनवा आणि सबमिट करा.
  • लगेचच एक रेफरन्स OTP येईल.
  • ICICI बँकेच्या कोणत्याही ATM मध्ये जा.
  • कार्डलेस कॅश विड्रॉल निवडा, तिथे डिटेल्स भरा.
  • यानंतर तुम्हाला पैसे मिळतील.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment