ही तर नव्या परंपरेची सुरुवात : प्रिन्स हॅरी व मेगन

आर्थिक स्वावलंबनासाठी प्रिन्स हॅरी व मेगनने ब्रिटिश राजघराण्याचा वरिष्ठ दर्जा सोडला; दांपत्य म्हणाले, ही तर नव्या परंपरेची सुरुवात
ब्रिटनचा युवराज हॅरी व त्याची पत्नी मेगन मर्केलने जगाला आश्चर्याचा धक्का देत शाही वारसा सोडण्याचा निर्णय घेतला. बुधवारी घोषणा करत राजघराण्याच्या वरिष्ठ सदस्यपदापासून वेगळे होत आर्थिक स्वावलंबनाचे नियोजन आखत असल्याचे सांगितले. हॅरी हा महाराणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आहे. ब्रिटिश गादीसाठी सहाव्या क्रमांकाचा दावेदार आहे. हॅरी व मेगनने वारसा सोडण्याबाबत राजघराण्यातील कोणत्याही व्यक्तीशी चर्चा केली नाही. हॅरीचा मोठा भाऊ विल्यम हा नाराज आहे. २०१८ मध्ये हॅरी व मेगनच्या लग्नानंतर महाराणीने त्यांना ससेक्सचे ड्यूक व डचेसचा दर्जा दिला होता.

हॅरी व मेगनने इन्स्टाग्रामवर लिहिले, अनेक महिन्यांपर्यंत विचार व चर्चेनंतर आम्ही हा निर्णय घेतला. ही राजघराण्यात नव्या परंपरेची सुरुवात असेल. आम्ही पुढील आयुष्य यूके व उत्तर अमेरिकेत घालवणार आहोत. यामुळे आम्हाला आमच्या आयुष्याच्या नव्या अध्यायावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल व आमची नवी धर्मदाय संस्था सुरू करता येईल.
१९३६ मध्ये एडवर्ड-८ ने लग्नासाठी राजगादी सोडली होती : राजकारण्याचे माजी प्रेस अधिकारी डिक्की आर्बिटर यांनी या निर्णयाची तुलना १९३६ मध्ये एडवर्ड-८ यांच्या दोन वेळची घटस्फोटिता वॅलिस सिम्पनसोबत लग्नासाठी राजगादी सोडण्याच्या निर्णयाशी केली.
राजघराण्यातील सदस्य असूनही हॅरी व मेगन यांना स्वत:चा एक पैसाही कमावण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यांना अनुदानावर अवलंबून राहावे लागते. मात्र तेही कोट्यवधी रुपयांत असते. या दांपत्यावर अनेकदा ब्रिटनच्या करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोगाचा आरोप झाला आहे. वारसा हक्काने त्यांना मिळालेली वैयक्तिक मालमत्ता सुमारे ३०६ कोटी रुपये आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment