![]() |
राज्यातून सर्वाधिक 16 हजार कोटींचा GST |
देशभरातून वस्तू व सेवा करप्रणालीअंतर्गत वसूल केल्या जाणार्या जीएसटी करप्रणाली अंतर्गत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
साडेसोळा हजार कोटी : गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबर अखेर महाराष्ट्राने सर्वाधिक 16 हजार 530 कोटी रुपयांचा कर जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारला दिला आहे. या करात 22 टक्के इतकी वाढ झाली आहे.
कर संकलन : डिसेंबर 2019 अखेर केंद्र सरकारने 1 लाख 3 हजार 184 कोटी रुपये कर वसूल केला आहे. यात केंद्र सरकारचा 19 हजार 962 कोटी, राज्य सरकारांचा 26 हजार 792 कोटी तर आयजीएसटी अंतर्गत 48 हजार 99 कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे.
टॉप 5: कर संकलणार महाराष्ट्राच्या पाठोपाठ दुसरा क्रमांक कर्नाटक, तिसरा गुजरात, चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू व नंतर उत्तर प्रदेश राज्याचा क्रमांक लागतो.
0 comments:
Post a Comment
Please add comment