आमदार गोरंट्यालही राजीनामा देणार?

काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल हे देखील मंत्रिपद न मिळाल्याने बंडाच्या तयारीत आहेत. आपण कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असे आमदार गोरंट्याल यांनी म्हटले आहे. गोरंट्याल यांनीही राजीनामा दिल्यास हा महाराष्ट्र विकास आघाडीला दुसरा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याबाबत काय निर्णय घ्यावा याबाबत विचार करण्यासाठी महेश भवन येथे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. गोरंट्याल यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत आपल्यावर अन्याय झाला आहे अशी भावना व्यक्त केली आहे. आपला मंत्री मंडळात समावेश करण्याचे आश्वासन मिळाले होते, पण ऐनवेळेस आपल्याला का डावलले हे समजत नाही. आपण तीनवेळा निवडून आलो आहोत. आता तर शिवसेनेचे राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांचा मोठ्या फरकाने आपण पराभव केला आहे. असे असतानाही आपल्याला डावलले अशी खंत गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे.

गोरंट्याल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जागा मिळवून दिल्याचेही समर्थक सतत निदर्शनास आणून देत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ असतानाही त्यांना मंत्रीमंडळात स्थान का मिळाले नाही असे प्रश्न त्यांचे नाराज कार्यकर्ते विचारू लागले आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. या संदर्भात गोरंट्याल यांनी आज (शनिवार ४ डिसेंबर) आपली भूमिका ठरवण्यासाठी बैठक बोलवली आहे.

या बरोबरच त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे २८ नगरसेवक निवडून आणले आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी तब्बल २६ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे गोरंट्याल यांच्यासाठी कोणत्याही मोठ्या नेत्याने सभा घेतली नव्हती.

याच कारणांमुळे आपली राज्याच्या मंत्रिमंडळात नक्कीच वर्णी लागेल असा विश्वास गोरंट्ला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होता. मात्र गोरंट्याल यांचा विस्तारादरम्यानही मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची गोरंट्याल यांची भावना झाली. कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यास सुरुवात केली. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी गोरंट्याल यांनी स्थानिक कार्यकर्ते, माजी आमदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment