अक्षय कुमार, करीना कपूर-खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. एका आठड्याभरात चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली असून आठ दिवसांच्या कमाईचा आकडा हा १३० कोटींच्यावर पोहोचला आहे.
तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार 'गुड न्यूज'नं पहिल्या दिवशी २७ कोटी, दुसऱ्या दिवशी २१.७८ कोटी, तिसऱ्या दिवशी २५.६५ कोटींची कमाई चित्रपटानं केली आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून नववर्षांच्या पहिल्याच दिवशी चित्रपटानं २२.५० कोटींची कमाई केली होती.
बॉक्स ऑफिस इंडिया वेबसाइटनुसार 'गुड न्यूज' चित्रपटाने 'दबंग-३' चित्रपटालाही कमाईच्या पिछाडीवर टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरील कमाईतही चित्रपटानं बाजी मारली असून पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं एकूण ४५.८२ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, युएईमध्येही प्रदर्शित झाला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment