मध्य-पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्याच्या किमतींनी उसळी घेतली होती. 'एमसीएक्स'मध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४१२९३ रुपयांवर गेला होता. मात्र अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील तणाव निवळल्याने सोने स्वस्त झाले आहे. सोमवारी सोन्याचा भाव ०.२३ टक्क्याने कमी झाला. तो ३९७८० रुपये झाला आहे. चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदीचा भाव ४७७५५ रुपये आहे. यात ०.३३ टक्के घसरण झाली. चलन बाजारात रुपयाचे मूल्य वधारत असल्याने सोन्याला फायदा होत आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने मध्य-पूर्वेत निर्माण झालेला तणाव निवळल्यानंतर जागतिक कमॉडीटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. मागील आठवडाभरात देशातील कमॉडीटी बाजारात (एमसीएक्स) सोने १५०० रुपयांनी स्वस्त झाले असून सोन्याचा भाव ३९७८० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
जागतिक कमॉडीटी बाजारात सोने ०.४ टक्क्याने स्वस्त झाले असून भाव प्रती औंस १५५५.७६ डॉलरपर्यंत खाली आला आहे. चांदीच्या भावात ०.२ टक्के खाली आला असून तो १८.०५ डाॅलर आहे. सोने स्वस्त होण्यामागे आणखी एक कारण आहे. दीड वर्षांहून अधिक काळ सुरु असलेला अमेरिका आणि चीन यामधील व्यापारी तंटा मिटवण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेतला आहे. या संघर्षात जागतिक कमॉडीटी बाजारात सोने दरात १८ टक्के वाढ झाली होती.
0 comments:
Post a Comment
Please add comment