ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोपी ऋषिकेश देवडीकरला बेड्या

गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोपी ऋषिकेश देवडीकर


बेंगळुरू: गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी असलेला ऋषिकेश देवडीकर धनबादमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती एसआयटीला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून ऋषिकेशच्या मुसक्या आवळल्या.
कतरासमधील व्यापारी प्रदीप खेमका यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर ऋषिकेश काम करत होता. त्याने आपली ओळख लपवली होती. वेगळ्याच नावाने तो तिथे वावरत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात यश मिळवले. ऋषिकेश जिथे वास्तव्याला होता त्या घराची झडती घेतली जात असून त्यात काही महत्त्वपूर्ण दस्तावेज व माहिती हाती येण्याची शक्यता आहे.
ऋषिकेशला आज धनबादमधील कोर्टात हजर करण्यात येणार असून कोठडी घेतल्यानंतर बेंगळुरूत आणून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४ वर्षे) याला अखेर अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात कतरास येथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असून तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्ये प्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध कवी आणि पत्रकार पी. लंकेश यांच्या कन्या गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बेंगळुरूत हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गौरी या 'लंकेश पत्रिका'च्या संपादिका होत्या.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment