फेसबुकची नवीन डिझाईन सादर करण्यात येत असलेल्या नवीन लूकचे नोटिफिकेशन युजर्सला पाठविण्यात येत आहे. गत वर्षाच्या प्रारंभीच फेसबुकचे रिडिझाईन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या अनुषंगाने फेसबुकचे बोधचिन्ह अर्थात लोगो बदलण्यात आला होता. यानंतर आता नवीन स्वरूपातील फेसबुक हे युजर्सला सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
युजर्सला फेसबुकतर्फे नवीन लूक वापरण्याचे आवाहन केले जात आहे. या युजर्सच्या माध्यमातून नवीन डिझाईन करण्यात आलेल्या फेसबुकची चाचणी घेतली जात आहे.
असा असेल बदल :
फेसबुकच्या अंतर्गत कव्हर इमेजच्या मध्यभागी आता युजरला प्रोफाईल फोटो असेल.
मित्रांच्या स्टोरीज लाईक करण्यासाठीचा विभाग मोठा केला जाणार आहे.
या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
फेसबुकच्या युजर्सला डार्क मोडदेखील प्रदान करण्यात येणार आहे.
सध्या युजर्सच्या माध्यमातून या नवीन डिझाईनची चाचणी घेण्यात येत असून नंतर सर्वांसाठी हे अपडेट देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment