![]() |
ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध दिले चौकशीचे आदेश |
प्रतिस्पर्धा आयोगा(सीसीआय)ने कायद्याच्या कथित उल्लंघन प्रकरणात दिग्गज कंपन्या अमेझॉन आणि वॉलमार्टच्या नियंत्रणातील फ्लिपकार्टविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. एका अहवालानुसार, आयोगाने सोमवारी हा आदेश पारीत करत सांगितले होते की, मोबाइल फोन ब्रँड आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मदरम्यान विशेष करार केला जातो. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे काही विक्रेत्यांना प्राधान्य देण्याशी संबंधित आरोपावरून चौकशी झाली पाहिजे. सीसीआयला हा आदेश अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसाठी माेठा झटका आहे. भारतातील लहान व्यावसायिक या दोन्ही कंपन्यांवर दीर्घावधीपासून मोठी सवलत देणे आणि देशातील एफडीआय कायद्याचे उल्लंघन करण्याचा आरोप ठेवत आहेत. किरकोळ व्यावसायिकांची सर्वाेच्च संघटन कॅटने या दोन्ही ऑनलाइन मार्केटप्लेसवर विक्रीत सूट देण्यास विरोध आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment