माणगावजवळ एसटी बसचा अपघात

माणगावजवळ एसटी बसचा अपघात


मुंबईहून ही बस दापोलीकडे जात असतानाच पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव बस पुलाचा कठडा तोडून पुलावरून खाली कोसळली. अपघातातील सर्व जखमींना तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावपासून जवळच असलेल्या कळमजे पुलावरून एसटी बस खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
बस क्रमांक: एमएच १४-बीटी-०४१३ असा आहे. ही बस दापोली डेपोची होती. मुंबईतील परळ डेपो येथून ही बस दापोलीला जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमजे पूल १०० वर्षे जुना असून पुलाचा कठडा कमकुवत होता का, याचाही तपास केला जात आहे.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment