मठाधीपती पिसाळ यांची निर्घृण हत्या


पंढरपूर: अनिलनगर परिसरातील प्रसिद्ध कराडकर मठाचे मठपती जयवंत हिंदुराव पिसाळ यांची भरदुपारी चाकूने वार करून निघृण हत्या केल्याने पंढरपुरात खळबळ उडाली आहे. याच मठाचे या पूर्वीचे मठाधीपती बाजीराव बुवा कराडकर यांनीच पिसाळ यांची हत्या केली आहे. पोलिसांनी कराडकर यांना ताब्यात घेतले आहे.

पंढरपुरातील अनिलनगरात बंडातात्या कराडकर यांचा कराडकर मठ आहे. आरोपी बाजीराव बुवा कराडकर हे या मठाचे मठाधीपती होते. मात्र ट्रस्टने ठराव करून सन २०१६ मध्ये कराडकर यांना पदावरून हटवले आणि त्यांच्या जागी जयवंत हिंदुराव पिसाळ यांची मठाधीपती म्हणून नियुक्ती केली. याचा मोठा राग कराडकरांच्या मनात होता. ट्रस्ट आणि कराडकर यांचे सतत वाद सुरु होते. या वादाचे पर्यवसन अखेर हत्येत झाल्याचे बोलले जात आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment