गिरगावात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला रविवारी काळबादेवी येथील्या श्री ठक्कर भोजनालयातून खास जेवणाची थाळी खाण्याचा मोह झाला. हा मोहच या व्यापाऱ्याला महागात पडला आहे. या व्यापाऱ्यानं रविवारी दुपारी भोजनालयाचा नंबर गुगलवरून शोधून काढला. त्या नंबरवर फोन करून दुपारी जेवणाची थाळी ऑर्डर केली. ऑर्डर आल्यावर पैसे देतो असं या व्यापाऱ्यानं सांगितलं. परंतु ऑर्डर घेणाऱ्या व्यक्तीनं कॅशऑन डिलिवरीसाठी नकार दिला.
नेमकं घडलं काय?
व्यापाऱ्यानं ऑर्डर दिली खरी मात्र ऑर्डर घेणाऱ्यानं कॅश ऑन डिलिवरीला नकार दिला. तुम्ही ऑर्डर दिली हे कशावरून समजायचं. बऱ्याचदा आमची फसवणूकही केली जाते असं ऑर्डर घेणाऱ्याचं म्हणणं होतं. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक लिंक देतो त्यावर तुम्ही रक्कम पाठवा. त्यानंतर तुमची ऑर्डर कन्फर्म होईल. व्यापाऱ्यानं फोन ठेवत त्या लिंकवर क्लिक केलं. त्यानंतर आपलं नेटबँकिंग सुरू करून आपला ID आणि पासवर्ड अपलोड केला मात्र OTP येत नव्हता. त्यामुळे पैसे खात्यातून गेल्याचं समजत नव्हतं. म्हणून व्यापाऱ्यानं पुन्हा एकदा ऑर्डर घेणाऱ्याला फोन केला. त्यावेळी समोरच्या माणसानं सांगितलं मोबाईल रिस्टार्ट करा म्हणजे OTP येईल. व्यापाऱ्यानं मोबाईल रिस्टार्ट केला आणि त्याचा प्रॉब्लेम सुटण्यापेक्षा अधिक गुंता झाला. त्याला आपल्या अकाऊंटमधून पैसे जात असल्याचं दिसत होतं. मात्र काहीच करू शकला नाही.
व्यापाऱ्यानं थेट स्थानिक पोलिसात धाव गेली. घडलेला प्रकार सांगताना व्यापाऱ्याला घाम फुटला. कारण एक थाळी ऑर्डर करण्याच्या नादात त्याची एक लाख रुपयांची फसवणूक झाली होती. सध्या व्यापाऱ्याच्या मोबाईलमधील sms आणि फोन यांच्या आधारावर पोलिसांमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment