कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. मात्र कोथिंबीरीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. याच पार्श्वभूमीवर कोथिंबीरीची लागवड कशा प्रकारे करावी याबाबत जाणून घेऊ.
हवामान आणि जमीन :
● तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आतच असावे.
● कोथिंबीरीच्या पिकासाठी मध्यम जमीन निवडावी.
● सेंद्रिय खते वापरणार असल्यास हलकी जमीन निवडावी.
सुधारीत जाती : नंबर 65 टी, 5365 एनपीजे, 16 व्ही, 1 व्ही 2 आणि को-1, डी-९२, डी-94, जे 214, के 45.
लागवडीचा हंगाम : कोथिंबीरीची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड करतात.
लागवड पध्दती :
● शेत उभे-आडवे नांगरुन चांगले भुसभुशीत करावे.
● प्रत्येक वाफ्यात 8 ते 10 किलो शेणखत टाकावे.
● बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे.
*खते आणि पाणी व्यवस्थापन* :
● बी पेरताना शेणखत जमिनीत मिसळून द्या.
● पेरणीच्या वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्रखत द्या.
● बी उगवून आल्यावर 25 दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्र द्या.
किड व रोग : काही वेळा मर रोगाचा प्रार्दूभाव होतो.
काढणी उत्पादन आणि विक्री :
● कोथिंबीरी हिरवीगार आणि कोवळी असतानां काढावी.
● नंतर कोथिंबीरीच्या जुड्या बांधून गोणपाटात व्यवस्थीत ठेवावी.
● कोथिंबीरीचे हेक्टरी 10 ते 15 टन उत्पादन मिळते.
0 comments:
Post a Comment
Please add comment