करोना व्हायरस राजस्थान, बिहारमध्ये ....

करोना व्हायरस राजस्थान, बिहारमध्ये ....


भारतातील काही राज्यात संशयित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रानंतर रविवारी राजस्थानमधील जयपूरमध्ये एक संशयित रुग्ण आढळला तर बिहारमध्येही एका मुलीला हा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी रविवारी माहिती दिली. एका विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
चीनमध्ये एमबीबीएस चा कोर्स पूर्ण केल्यानंतर तो भारतात परतला होता. 
या डॉक्टरला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची शक्यता असल्याने त्याला एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. या संशयीत रुग्णाचा रक्ताचे नमुणे पुण्यातील राष्ट्रीय व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठवले आहे. राज्यातील चार जिल्ह्यात एकूण १८ लोक चीनहून भारतात परतले आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रमुख आणि आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांची २४ तास देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
चीनमध्ये धुमाकूळ घालणारा जीवघेणा करोना व्हायरस भारतात पोहोचला आहे. चीनमध्ये आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जगभर या रोगाची भीती पसरली आहे. 


बिहारमधील छपरा मध्ये एका मुलीला करोना व्हायरस झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही मुलगी चीनमध्ये शिक्षण घेत होती. शिक्षण घेऊन परतल्यानंतर तिला हा आजार झाला असावा असा संशय आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चीनमध्ये न्यूरो सायन्स मध्ये पीएचडी करणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनी २२ जानेवारी रोजी भारतात परतली होती. तिची प्रकृती बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टर विनय कुमार यादव यांनी दिली. देशात विमानतळावर भारतात परतणाऱ्या प्रवाशांची योग्य तपासणी केली जात आहे. रविवारपर्यंत १३७ उड्डाणाहून आलेल्या जवळपास २९ हजारांहून अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment