मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर



गेल्या सहा दिवसांपासून रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खातेवाटपाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केलं असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ३० डिसेंबर रोजी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र काही खात्यांबाबत काँग्रेसने आग्रह धरल्याने खातेवाटपाचा तिढा कायम राहिला होता. त्यामुळे सहा दिवस उलटले तरी खातेवाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. मात्र, खातेवाटप लांबत चालल्याने काँग्रेसनेच एका पाऊल मागे घेतल्याने खातेवाटपाचा तिढा सुटला. त्यानंतर काल सायंकाळी ७ वाजता राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी पाठवण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सकाळी या यादीला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर केलं आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment